| तळा | वार्ताहर |
इंदापूर- तळा रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी 6 वा च्या दरम्यान निगुडशेत फाटा येथे ऍक्टिव्हा व एर्टीका याची निगुडशेत फाटा येथील वळणावर समोरासमोर ठोकर होऊन तन्वीर शाहिद रहाटविलकर याला गंभीर दुखापत झाली असून माणगाव उप जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी तातडीने पाठविण्यात आले व पुढील उपचारासाठी एम्.जी.एम् रुग्णालय कळंबोली येथे उपचार सुरू आहेत.
अर्टिकाचे मालक सुयोग मनोहर चव्हाण हे माणगाव येथे जात असताना निगुडशेत फाटा येथे पोहचले असता समोरून इंदापूर बाजूकडून अॅक्टिव्हाने रस्त्याच्या विरुद्ध बाजूला येऊन कारच्या समोरील उजव्या बाजूला जोरात धडक दिली. त्यामुळे स्कुटी चालक जोरात आदळल्याने डोक्याला व इतर ठिकाणी जोरात दुखापत झाली जखमीला तातडीने माणगाव येथे उपचार करता पाठवण्यात आले. या घटनेची फिर्याद सुयोग मनोहर चव्हाण यांनी तळा पोलीस ठाण्यात दाखल केली असून पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरेश पवार हे करीत आहेत.