| खांब | वार्ताहर |
रोहा शहरातील नगर परिषद शाळा क्र. 3 व 5 येथे गणित दिनानिमित्त गणित दिवस व विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमासाठी नगरपरिषद सी.ई.ओ श्री. एडके, प्रशासकीय अधिकारी शिक्षक विभाग संतोष कुंठे, पंचायत समित शिक्षण विभागाच्या सहाय्यक प्रकल्प समन्वयक श्रीमती गुजर, नगरपरिषदचे केंद्रप्रमुख श्री. लाडे, नगरपरिषदच्या लिपिक पूजा खुले, तसेच नगर परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, दीपक फाऊंडेशनचे सहाय्यक प्रकल्प समन्वयक आणि स्टेम प्रकल्पाचे कर्मचारी उपस्थित होते. तर, प्रदर्शनामध्ये 32 सहभाग नोंदवून एकूण मुलांनी 30 वैज्ञानिक व गणितीय प्रतिकृततींचे सादरीकरण केले. दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान, दीपक फाऊंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.