माथेरानला पुन्हा दरवाढीचा फटका; पर्यटन व्यवसाय संकटात

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान मधील पाण्याचे दर पुन्हा एकदा वाढले असून माथेरान मध्ये पाणी दरवाढ झाली असल्याने येथील पर्यटन व्यवसाय धोक्यात येऊ पाहत आहे. माथेरानमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नळपाणी योजना चालविली जाते. नगरपरिषद नळपाणी योजना चालवीत नसल्याने प्राधिकरण स्थानिकांची लूटमार करीत असल्याचे दिसून येत आहे. देशात सर्वाधिक पाण्याचे दर हे माथेरान मध्ये असून माथेरान मध्ये प्रति हजार लिटरसाठी असलेले दर पाहिले कि माथेरानमध्ये सर्व महाग मिळते, हे पाणी महाग असल्याचे सातत्याने बोलले जाते.

माथेरान हे पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून आहे त्याच प्रमाणे जवळपासच्या गावातील लोकांना चांगले उत्पन्न मिळवता येते मात्र सातत्याने वाढणाऱ्या पाणी दरांमुळे येथील व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. ज्या पद्धतीने शेती उद्योगाला सरकार आर्थिक मदत देत असते तशीच मदत पर्यटनाला देण्याची गरज आहे. त्यामुळे माथेरान शहरातील शारलोट लेक आणि सिम्पसन टँक या दोन तलावांची क्षमता वाढविण्याची बोलली जाते. गेल्या दहा बारा वर्षात मोठ्या प्रमाणात दर वाढू लागले आहेत. घरगुती वापरासाठी असलेला दर स्लॅब प्रमाणे किमान 26 ते कमाल रु. 53 प्रति एक हजार लिटर इतका आकारण्यात येतो. धर्मादाय संस्था यांच्यासाठीचे दर रु. 69 तर हॉटेल्स मध्ये तीन ग्रेड नुसार अ वर्ग रु. 178, ब वर्ग रु. 141 व क वर्ग रु. 118 प्रति 1000 लिटर वापरासाठी आकारण्यात येतो. माथेरान मधील हे वाढते पाणी दर शहरातील लहान सहान लॉजिंग व्यवसायिक आणि स्थानिक नागरिकांचे चहाची दुकाने, रेस्टोरंट आहेत. त्यांना असलेले पाण्याचे व्यवसायिक हे त्यांचे व्यवसाय केलेले सर्व पैसे पाणी बिलापोटी खर्च होत आहेत.

ऑगस्टपासूनचे पाण्याचे दर (प्रति 1000 लिटर)
बिगर घरगुती, वाणिज्य, धर्मादाय संस्था 69.19 रुपये.
अ वर्ग - 178. 64 रुपये, ब वर्ग - 141. 35 रुपये, क वर्ग - 118.58 रुपये.
घरगुती - 1000 लिटर प्रमाणे
15000 लिटरच्या पुढे - 26.62 रुपये,15001 ते 25000 - 39. 82 रुपये, 25001 ते पुढे 53.37 रुपये.
Exit mobile version