चार जण जखमी
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत एसटी आगारातील कर्जत-नेरळ-माथेरान मिनीबसला कर्जत- कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर किरकोळ अपघात झाला. मिनीबस पुढील वाहनचालकाने आपल्या वाहनाचा ब्रेक लावल्याने मिनीबस त्या वाहनावर आदळली आणि अपघात झाला असून या अपघातात दोन प्रवासी आणि मिनीबसचे चालक वाहक जखमी झाले आहेत.
या अपघातात राज्य परिवहन महामंडळाच्या मिनीबस नुकसान झाले असून एसटी गाडीमधील चौघे किरकोळ जखमी झाले आहेत. मिनीबस मधील आनंदी कुमार चौधरी तसेच अजित कोळी हे पर्यटक प्रवासी जखमी झाले असून गाडीचे चालक खैरे आणि वाहक महेंद्र तेली हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्या सर्वांना तेथून काही अंतरावर असलेल्या रायगड हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे अशी माहिती कर्जत एसटी आगाराचे प्रमुख शंकर यादव यांनी दिली आहे.