माथेरान हत्याकांड: पतीनेच हत्या केल्याचे निष्पन्न

आरोपी नवऱ्याला नवीन पनवेल मधून अटक
। अलिबाग । वार्ताहर ।
रविवार दि. १२ डिसेंबर रोजी माथेरानमधील एका लॉजमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेचा खून तिच्याच पटीने केला असावा असा संशय माथेरान पोलिसांनी व्यक्त केला होता. याच दरम्यान, नवीन पनवेलमधील आरोपीच्या राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली आहे.

माथेरानमध्ये घडलेल्या महिलेच्या हत्याकांड प्रकरणी न्यायालयाने आरोपी रामसिलोचन पाल याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.चारित्र्याच्या संशयावरुन रामसिलोचन पालने आपली पत्नी पूनम हिचा खून करुन तिचे शिर कापून ते खोल दरीत फेकले होते.पोलिसांनी तातडीने तपास करुन आरोपीला अटक केली.मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


चारित्र्याच्या संशयावरून हा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. माथेरानमधील एका लॉजमध्ये आरोपी नवऱ्याने आपल्या पत्नीचा गळा दाबून आणि नंतर चाकूने शीर वेगळे करून पत्नीची निर्घृण हत्या केली. या उत्तर भारतीय जोडप्याने मे २०२१ मध्ये लग्न केले होते आणि ते दोघेही नोकरीनिमित्त बाहेर राहत होते. यामुळे त्यांच्यातील संशय वाढला आणि माथेरान मध्ये येऊन पतीने पत्नीचा खून केला. दरम्यान, या खुनाच्या आरोपीला रायगड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने २४ तासांच्या आत नवीन पनवेल येथील घरातून आरोपीला ताब्यात घेतले असून पत्नीचे शीर माथेरान मिनिट्रेन मार्गावरील सखाराम तुकाराम पॉईंट येथील दरीत फेकून दिल्याची कबुली आरोपीने दिली व ते शीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version