| उरण | वार्ताहर |
पिरकोन सारडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्यालगत अज्ञात महिलेत्या खून प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सदर खूनप्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिस यंत्रणेला यश आले असून सदर महिलेचा खून का केला याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम व सूर्यकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणेने सदर महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळाचे पंचनामे करून तपासाची चक्रे फिरली. आरोपी हा मृत महिलेचा जावई असल्याचे प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न होत आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींवर याआधी मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. सराईत गुन्हेगार असलेल्या या आरोपीच्या दोन बायका असून मृत महिला ही संशयित आरोपीच्या दुसऱ्या बायकोची आई असल्याचे प्रथमदर्शनी तपासात पुढे येत आहे. संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने सदर गुन्ह्याची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे.