| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान नगरपरिषद आरोग्य विभाग आणि बीजे हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत शासनाच्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत विविध प्रकारच्या आरोग्य शिबिरांचे यांचे आयोजन करण्यता आले आहे. दरम्यान, बालक-पालक सभा, आयुर्वेद दिवस, निबंध स्पर्धा, लसीकरण, बचत गट, महिलांसाठी पोषण माह, आरोग्यदायी रेसिपी, रक्तदान शिबिर व आरोग्य शिबीर इत्यादी कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती बीजे हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली मिसाळ यांनी दिली आहे. तसेच, या आरोग्य सप्ताहात सेंट झेव्हयर्स कॉन्व्हेन्ट स्कूल मध्ये आयुर्वेद दिनानिमित्त बालक पालक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आभा कार्ड काढण्यासाठी आवाहन, निबंध स्पर्धेचे आयोजन आणि लहान बालके आणि विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. या आरोग्य सप्ताहात रविवारी (दि.28) इंदिरा नगर येथे आभा आयुष शिबीर आयोजित केले आहे. तसेच, सोमवारी (दि.29) महिला बचत गटाच्यासाठी मदतीने पोषण माह निमित्त महिला बचत गट सदस्यांना आहारतज्ञ ऋतुंभरा नार्वेकर यांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.







