माथेरान पालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान या पर्यटन स्थळी येणारे पर्यटकांकडून पालिका 50 रुपये स्वच्छता कर आकारत असते. मात्र, या बदल्यात किमान स्वच्छता गृह उपलब्ध केली असून शहराच्या वेगवेगळ्या भागात असलेल्या बहुतांश स्वच्छता गृहांची दुरवस्था झाली आहे. माथेरान शहरातील प्रेक्षणीय स्थळी असलेली स्वच्छतागृह कायम स्वच्छ राहावीत यासाठी माथेरान निसर्ग पर्यटन संस्थेकडून मागील चार वर्षे पाठपुरावा केला जात आहे. दरम्यान, माथेरान पालिकेकडून स्वच्छता गृहांची स्वच्छता केली जात नसल्याने माथेरान निसर्ग पर्यटन संस्था उपोषण करणार आहेत.

माथेरान शहरातील प्रेक्षणीय स्थळ असलेल्या ठिकाणी पर्यटकांच्या सोयीसाठी स्वच्छता गृह उभारण्यात आली आहेत. माथेरान पालिका शहरात येणारी पर्यटकांकडून 50 रुपये स्वच्छता कर आकारत असते. अशावेळी पर्यटकांसाठी असलेली स्वच्छता गृह स्वच्छ असावीत अशी साधी अपेक्षा आहे. पॉईंट वर असलेली स्वच्छता गृह वगळता अन्य कोणत्याही सुविधा माथेरान पालिका पर्यटकांना पुरवत नाही. त्यामुळे स्वच्छता गृह सुस्थितीत असतील अशी अपेक्षा आहे. परंतु, प्रेक्षणीय स्थळी असलेली बहुतांश स्वच्छता गृह हि अस्वच्छ आणि दुरवस्था झालेली आहेत.पॉइंट वरील जे नादुरुस्त स्वच्छता गृह आहेत. ती स्वच्छता गृह लवकरात लवकर व्यवस्थित करून घेण्यात यावी अशी मागणी माथेरान निसर्ग पर्यटन स्टॉल संघटना यांनी केली आहे.

सतत चार महिने पाठपुरावा करून देखील पालिका पर्यटकांच्या सेवेसाठी उभारलेली स्वच्छता गृह सुस्थितीत ठेवण्याची कार्यवाही करताना दिसत नाही. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात निसर्ग पर्यटन स्टॉल संघटनेचे अध्यक्ष संतोष कदम हे शहरातील श्रीराम चौकात उपोषण करणार आहेत, असा इशारा देणारे पत्रा माथेरान पालिकेला दिले आहे.

Exit mobile version