माथेरान पालिका सभांची माहिती ऑनलाईन आवश्यक

। माथेरान । वार्ताहर ।
नगरपरिषदेच्या सभागृहात विकास कामांसंदर्भात अथवा गावाच्या पायाभूत सुविधांचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी जे काही महत्वपूर्ण ठराव सभेत घेतले जातात त्याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन स्वरुपात दिली जावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नगरपरिषद प्रशासन संचालयाचे आयुक्त तथा संचालक डॉ. किरण कुलकर्णी यांनी राज्यातील सर्व नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांना आदेश दिले आहेत. माथेरान मध्ये मागील काळात याबाबत माजी विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदेंनी सभागृहात ही पद्धत सुरू करावी असे स्पष्टपणे सूचित केले होते. परंतु एकहाती सत्ता शिवसेनेची असल्याने याबाबत गांभीर्याने घेतले नव्हते. नगरपरिषदेच्या सभागृहातील सभांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते वेबसाईटवर प्रसिद्ध करणे ही पद्धत मागील काळात जर का सुरू झाली असती तर कदाचित गावाची कामे चांगल्या पद्धतीने आणि सकारात्मक विचाराने झाली असती आजपर्यंत जी काही घाईगडबडीत कामे पूर्ण करण्यासाठी जो काही सपाटा लावला होता त्यावर मोठया प्रमाणावर अंकुश राहिला असता नागरिकांनी सुध्दा आपल्या सूचना व्यक्त करून सर्व कामे पारदर्शक आणि टिकाऊ झाली असती असे सुज्ञ नागरिक बोलत आहेत.

Exit mobile version