। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान नागरी पतसंस्थेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन शिवराष्ट्र पॅनल तयार केले आहे. माथेरान नागरी पतसंस्था अनेक वर्षे चालविण्याचा अनुभव असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा चिटणीस अजय सावंत आणि माथेरान पालिकेवर एकहाती सत्ता मिळवून देणारे शिवसेना शहर संपर्कप्रमुख प्रसाद सावंत यांनी पतसंस्थेवर एकहाती सत्ता मिळविण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. माथेरान नागरी पतसंस्थेची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एक गट यांनी एकत्र येऊन तुल्यबळ प्रतिस्पर्धी यांचा सामना करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण 34 जागांसाठी तर विशेष मागासवर्ग प्रवर्ध 3 आणि महिला राखीव 8 अनुसूचित जाती जमाती 6 इतर मागासवर्गीय 3 एकूण 13 जागांसाठी 54 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. माथेरान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व माथेरान शिवसेना प्रसाद विश्वनाथ सावंत समर्थक गट यांचे शिवराष्ट्र गटामधून एकूण 13 उमेदवारांनी अर्ज भरले असून पतसंस्थेची निवडणूक लढविली जात आहे. निवडणुकीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले असून अजय काशिनाथ सावंत आणि विवेक चौधरी यांनी संस्थवर काम करताना संस्थेचा कारभार स्वच्छ आणि नॉन करप्शन संभाळला असल्याने पतसंस्थेचा दर्जा उंचावलेला असल्याचा शिवराष्ट्र पॅनल चा दावा आहे.त्यामुळे अजय सावंत आणि प्रसाद सावंत यांच्या एकत्रित येण्याने निर्माण झालेला शिवराष्ट्र पॅनल हि आगामी माथेरान गिरिस्थान नगरपरिषद निवडणुकीची तयारी आहे असे बोलले जात आहे. आणि त्यामुळे माथेरान पतसंस्थेवर शिवराष्ट्र पॅनल चे वर्चस्व मिळवून पालिका निवडणुकीची तयारी करण्याचा या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा पर्यटन दिसून येत आहे.