ई-रिक्षासाठी माथेरानकरांची एकजूट

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान मधील पर्यावरणपूरक ई-रिक्षा पुन्हा सुरू व्हावी यासाठी कायदेशीर लढाई लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय माथेरान पर्यावरण संवेदनशील नागरिक मंच यांनी आयोजित केलेल्या बैठकीत घेतला. माथेरान मधील बहुसंख्य नागरिक यांचा सहभाग असलेल्या या प्रश्‍नांवर सर्वोच्य न्यायालयात जावून लढाई लढली पाहिजे आणि जिंकावी लागेल, असे आवाहन माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी केले.

पर्यावरण पूरक ई-रिक्षचा पायलट प्रकल्प संपला आहे. मात्र त्यामुळे बंद झालेली ई-रिक्षा सुरू करण्यात यावी आणि पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांच्या कामाला स्थगिती देण्याचा सर्वोच्य न्यायालयाने निर्णय घेतला आहे. त्याविरूध्द माथेरान पर्यावरण संवेदनशील नागरिक मंच यांच्याकडून नागरिकांची सभा येथील कम्युनिटी सेंटर मध्ये आयोजित करण्यात आली होती. राजकीय पक्ष, जेष्ठ नागरिक, हॉटेल व्यवसायिक, दिव्यांग यांची ही बैठक होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित नागरिक यांच्यासह माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश दुब्बल, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष राजेश दळवी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख कुलदीप जाधव, भाजप शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, चर्मकार संघटनेचे अध्यक्ष गजानन आबनावे, पॉइंट स्टॉल धारक संघटना अध्यक्ष संतोष कदम, शेकाप शहर चिटणीस शफीक शेख, आरपीआय आठवले गट शहर अध्यक्षा अनिल गायकवाड, व्यापारी फेडरेशनचे नितीन शाह, भाजप संघटक किरण चौधरी यांच्यासह नारायण कदम, शैलेंद्र दळवी, चंद्रकांत जाधव,अरविंद शेलार आदी उपस्थित होते. माथेरान पर्यावरण संवेनशील मंचचे सुनील शिंदे, प्रदीप घावरे, शकील पटेल, राजेश चौधरी आदींनी ही बैठक घेण्यासाठी पुढाकार घेतला होता.

माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी ई-रिक्षाने आर्थिक क्रांतीची सुरुवात असल्याचे दाखवून दिले आहे. सर्वोच्य न्यायालयाचा निर्णय हा दुर्दैवी असून नामवंत वकिलांची फौज उभी करणे गरजेचे आहे. घोडा हा माथेरानसाठी महत्वाचा असून आम्ही सर्व पॉईंटच्या ठिकाणी ई-रिक्षा जावी असे कुठेही नमूद केले नाही. मात्र आपल्या गावातील पीटिशन दाखल करणारे यांना यापूर्वी लावलेले पेव्हर ब्लॉक काढायचे याची मागणी केली आहे, हे सर्वांनी समजून घेतली पाहिजे आणि गैरसमज करण्याचा प्रयत्न केला तरी हाणून आवाहन केले. यावेळी माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, मुख्याध्यापिका कल्पना पाटील कुलदीप जाधव, मिलिंद कदम जनार्दन पारटे यांनी देखील आपले म्हणणे मांडले.

Exit mobile version