| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानमधील शालेय विद्यार्थी यांना आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत आणि परिश्रम घ्यावे लागतात. फारच कमी विद्यार्थी आपले ध्येय येथे पूर्ण करतात. मात्र, माथेरानमधील उद्योजक किरण चौधरी यांचे सुपुत्र सुर्यजित चौधरी याने मेहनत आणि कष्ट घेऊन आपल्या ध्येयाला गवसणी घातली आहे. त्याने लंडन मास्टर ऑफ सायन्स ईन इंटरनॅशनल हॉस्पॅलिटी मॅनेजमेंट ही पदवी प्रदान केली आहे. सोमवारी (दि.22) लंडन येथे मोठ्या थाटामाटात या पदवी प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोशल मीडियावर कार्यक्रमाचे फोटो झळकताच माथेरानच्या सर्व स्थरातून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे. माथेरानच्या शिरपेचात मानाचा तुरा सुर्यजितने रोवला आहे. सुर्यजित चौधरीच्या या यशाबद्दल त्याच्यावर तसेच त्याच्या आई वडिलांवर संपूर्ण माथेरान शहरांमधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.







