| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल को.ऑप.अर्बन बँक लि. पनवेलच्या सार्वत्रिक निवडणूक (दि. 27) होत असून या मध्ये पनवेल मधील शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी एकत्र लढत असून त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असल्याचे चित्र पनवेल तालुक्यात दिसत आहे.
या निवडणूकीच्या प्रचारासाठी शेकाप आ. बाळाराम पाटील, जे.एम. म्हात्रे, विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नारायण घरत, मुंबई कृषिउत्पन्न बाजार समितीचे राजेंद्र पाटील, पनवेल कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. दत्तात्रय पाटील, तालुका चिटणीस राजेश केणी, माजी नगरसेवक गणेश कडू, आर सी घरत, हेमराज म्हात्रे, बबन पाटील, मनोहर भोईर, सुहास पेटकर, रामदास पाटील, सुदाम पाटील आदी नेते मंडळी पनवेल शहर आणि तालुक्यातील गावात जाऊन प्रचार मोहीम राबवली. या मध्ये त्यांना मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात मिळाला.
पनवेल को.ऑप.अर्बन बँक लि. पनवेलच्या सार्वत्रिक निवडणूकित शेतकरी कामगार पक्षातून अनिल जनार्दन केणी, राजेश लक्ष्मण खानावकर, डॉ. हितेन बिहारीलाल शहा, दिलीप शंकर कदम, बळीराम परशुराम म्हात्रे, बाबुराव हरिभाऊ पालकर, पांडुरंग बंडू भगिवंत शिवसेना ठाकरे गटातून ज्ञानेश्वर धोंडू बडे, प्रवीण पोपटराव जाधव, नॅशनल काँग्रेस मधून अरविंद महादेव सावळेकर, जनार्दन पांडुरंग पाटील, विमल मल्लिनाथ गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस मधून विद्या भास्कर चव्हाण, असे एकूण 13 उमेदवार रिंगणात आहेत.