‘इंडिया’च्या बैठकीसाठी मविआची जोरदार तयारी

| मुंबई | प्रतिनिधी |

विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या तयारी संदर्भात बुधवारी मुंबईत मविआची आणखी एक बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, संजय निरुपम, वर्षा गायकवाड, जितेंद्र आव्हाड, सतेज पाटील, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.इंडियाची बैठक यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या परिषदेला नितीशकुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, भगवंतसिंह मान, स्टॅलिन, हेमंत सोरेन, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सीताराम येचुरी, डॉ. फारुक अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, लालू प्रसाद यादव आदी नेते उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची रणनीती, एकास एक उमेदवार उभा करणे या मुद्द़यांवर दोन दिवसांच्या बैठकीत सखोल चर्चा केली जाईल.

Exit mobile version