पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्षा आक्रमक

एमआयडीसी अधिकार्‍यांना धरले धारेवर
। महाड । प्रतिनिधी ।
महाड एमआयडीसीमार्फत महाड शहरातील नवेनगर, प्रभात कॉलनी आधी भागांना पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु, मागील तीन दिवसांपासून या भागाचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. यााबत माहिती मिळताच नगराध्यक्षांनी आक्रमक पवित्रा घेत एमआयडीसी कार्यालय गाठत अधिकार्‍यांना धारेवर धरले. त्यामुळे काही काळात पाणी पुरवठा सुरळीत झाला.
मागील तीन दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाल्याची माहिती नागरिकांनी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांना दिली. त्यांनी तातडीने एमआयडीसी कार्यालय गाठून पाणीपुरवठा उपअभियंता कवडजी यांची त्यांच्या दालनात माजी नगराध्यक्ष संदीप जाधव, उपनगराध्यक्ष सपना बुटाला आदींच्या उपस्थितीत भेट घेतली. आणि, जोपर्यंत महाड शहरातील खंडित झालेला पाणीपुरवठा पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली. उपअभियंता यांनी कार्यकारी अधिकारी संतोष कारंडे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. नगराध्यक्षा स्नेहल जगताप व धनंजय देशमुख यांनी त्यांना माहिती सांगितल्यावर दोन तासात पाणी सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासन कारंडे यांनी दिले.

Exit mobile version