नगराध्यक्ष डॉ. प्रशांत नाईक यांच्यावर सत्काराचा वर्षाव

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी मिळालेल्या नेल्सन मंडेला नोबेल पीस वार्डने व मानद डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर विविध संघटना, संस्था तसेच वैयक्तिक रित्या मोठया प्रमाणावर सत्कार केला जात आहे. जैन मित्रमंडळ गु्रपच्यावतीने बुधवारी डॉ नाईक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र प्यारेलाल, मुकेश जैन, सुनील जैन, कमलेश जैन, सम्राट जैन, संकेत जैन, कैलाश जैन, शंभु चोपडा, विपूल जैन, कुश चोप्रा, रिशभ चोपडा, योगेश जैन, संतोष जैन, हरेश जैन तसेच नगरसेवक अनिल चोपडा उपस्थित होते.

Exit mobile version