अलिबाग जैन समाजाने प्रशासनाला निवेदन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जैन गणधर आचार्य श्री.कुंथुसागरजी महाराज साहेब यांचे शिष्य आचार्य श्री कामकुमारनंदिजी मा.सा.यांचे 5 जुलै रोजी चिकोडी गाव जिल्हा बेळगाव, कर्नाटक येथून रात्री.10 वाजता अपहरण करून त्यांची निघृत हत्या करून त्या देहाचे तुकडे तुकडे करण्यात आले. जैन साधूची हत्या करणे ही जैन समाजाने जपलेल्या अहिंसा, करुणा आणि धार्मिक सलोक्याचा तत्वाचा अपमान आहे. या संपूर्ण घटनेने अहिंसावादी असलेल्या अल्पसंख्यांक जैन समाजावर खुप मोठा आघात आहे. या घटनेचा देशभरात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
अलिबाग जैन समाज संघटनेच्यावतीने घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करून आरोपींना अटक करून त्यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन जिल्हाधिकारी रायगड यांचे मार्फत शासनाला दिले आहे.
देशात सर्वधर्म समभाव जोपासत शांती, सत्य आणि अहिंसेचा प्रचार करण्यासाठी जैन समजताचे सुमारे 22000 साधू, साध्वीजी भगवंत संपूर्ण भारतात पायी भ्रमण करित असतात या सर्व गुरुभगवंतांना शासनातर्फे संरक्षण मिळावे अशी मागणी जैन समाज यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्याकडे लेखी निवेदाद्वारे करण्यात आली. या वेळी शांतिनाथ जैन मंदिर ट्रस्ट अध्यक्ष भरत शेठ, वसंत शेठ, प्रवीण जैन, आकाश ओसवाल, सम्राट जैन, मुकेश जैन, राजेंद्र जैन, अनिल चोपडा आदी मान्यवर उपस्थित होते