नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी घेतली पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांची भेट

शहरातील घरफोड्या रोखण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग शहरात नुकत्याच झालेल्या घरफोड्यांनसंदर्भात नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांना आपल्या सहकारी नगरसेवकांसह पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांची अलिबाग पोलिस ठाणे येथे जाऊन भेट घेतली. यावेळी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा झाली. रात्रीच्या वेळेतील पोलिस गस्त वाढण्या संदर्भातील मागणी नगराध्यक्षांनी केली. अशा घटनांना आळा बसवण्याच्या अनुषंगाने गृहनिर्माण सोयटींना सीसीटीवी बसवण्याचे तसेच आपल्या सदनिकेमध्ये भाडेकरू ठेवतांना त्यांची माहिती पोलिस ठाणे येथे देणे अशा विषयींची नागरिकांमध्ये जागरूता निर्माणकरण्याबाबत चर्चा झाली. ज्यामुळे चोरी सारख्या घटनांना आळा बसेल आणि दुर्देवाने अशी घटना घडलीच तर त्याचा छडा लावण्यास पोलिस यंत्रणेला मदत होईल. यावेळी उपनगराध्यक्ष अ‍ॅड मानसी म्हात्रे, गटनेते प्रदीप नाईक, सभापती अजय झुंजारराव, राकेश चौलकर, नगरसेवक वृषाली ठोसर, सुरक्षा शाह, संजना किर, अ‍ॅड. गौतम पाटील, अनिल चोपडा, महेश शिंदे आदी उपस्थित होते.

Exit mobile version