मयूर शेळके व साक्षी लाड यांचा कर्जत नगरपरिषदेतर्फे सत्कार

। कर्जत । प्रतिनिधी ।
मयूर सखाराम शेळके आणि साक्षी विलास लाड यांचा कर्जत नगरपरिषदेतर्फे सत्कार करण्यात आला. काही महिन्यांपूर्वी प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावर तोल जाऊन पडलेल्या लहान मुलाचा जीव मयूर शेळके याने वाचविला होता. त्याबद्दल त्याचा तसेच रायगड जिल्ह्याच्या 19 वर्षांखालील महिला क्रिकेट संघात दहिवली येथील साक्षी विलास लाड या महिला क्रिकेटपटूची निवड करण्यात आली आहे म्हणून तिचा या दोघांचा कर्जत नगरपरिषदेच्यावतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता.

व्यासपीठावर नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, पाणी पुरवठा सभापती सभापती राहुल डाळींबकर, बांधकाम सभापती स्वामिनी मांजरे उपस्थित होत्या. मयूर शेळके आणि साक्षी लाड यांचा नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक विवेक दांडेकर, नगरसेविका प्राची डेरवणकर, सुवर्णा निलधे, कार्यालयीन अधिक्षक अरविंद नातू, जितेंद्र गोसावी, सारिका कुंभार, सुदाम म्हसे, रुषिता शिंदे, सुनिल लाड, अशोक भालेराव, अविनाश पवार, कल्याणी लोखंडे, विशाल पाटील, बापू बेहराम, सामिया चौगुले, विलास गायकवाड, शेखर लोहकरे आदी उपस्थित होते.

Exit mobile version