| जालना | प्रतिनिधी |
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली आहे. मुंबईत 19 सप्टेंबरपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. गणपती बसवायचा आणि 15 सप्टेंबरला मंगळवारी मुंबईसाठी कूच करायचं, असे जरांगे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांचा मराठा मोर्चा 19 सप्टेंबरला म्हणजे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत येऊन धडकणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई आंदोलनाचा संभाव्य मार्ग आणि मुक्कामाची ठिकाणेही जाहीर केली आहेत. त्यानुसार 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथून निघून पाटोदा, जिल्हा बीड येथे मुक्काम, 16 सप्टेंबर रोजी श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर, 17 सप्टेंबर रोजी हडपसर, पुणे, तर 18 सप्टेंबर रोजी खोपोली किंवा कोपर खैराणे परिसरात मुक्काम करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर 19 सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करण्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली.






