मयूर तांबडे यांचा सन्मान

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल येथील पत्रकार मयूर तांबडे यांना ‌‘द ग्रेट पत्रकारिता आयकॉन‌’ अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. आई फाऊंडेशन, समृद्धी फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्यावतीने महाड येथे स्वराज्य भूमी, रायगड गौरव संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि ध्येयाने व धाडसाने केलेल्या कार्याची दखल घेत मयूर तांबडे यााांंना हा पुरस्कार देण्यात आला. पत्रकार मयूर तांबडे यांनी गेल्या तेरा वर्षांत अनेक वृत्तपत्रात काम केले असून पनवेल आणि ग्रामीण भागातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी पत्रकारिता सोबतच अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवले आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना यापूर्वी देखील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version