मयुरेश गंभीरच्या कोठडीत वाढ

। अलिबाग । प्रतिनिधी ।

पत्नीचा खून केल्याप्रकरणी मयुरेश गंभीरला मंगळवारी दुपारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत तीन दिवसाची वाढ केली आहे. मयुरेश गंभीरने त्याची दुसरी पत्नी प्रिती हीचा खून केला होता. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.

त्याला अलिबाग न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला 22 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आली होती. या कोठडीनंतर पुन्हा त्याला अलिबाग येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 25 ऑगस्टपर्यंत कोठडीत वाढ केली असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयातून उपलब्ध झाली.

Exit mobile version