एमसीएच्या क्रिकेट सामन्यांना सुरुवात

| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ गटातील पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेतील ग्रुप डी मधील सामन्यांना रायगड जिल्ह्यातील विविध मैदानांवर सुरवात करण्यात आली. ग्रुप डी मध्ये सहा संघ सहभागी झाले असून त्यामध्ये रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघासह नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन, क्लब ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल डिफेन्स अकॅडमी पुणे, वायएमसीए क्रिकेट क्लब पुणे, सेंट्रल झोन असे संघ सहभागी झाले आहेत.

रायगड जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान गव्हाण उलवे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्स रसायनी पाताळगंगा मैदान, रिलायन्स क्रिकेट ग्राउंड नागोठण ह्या मैदानांवर स्पर्धेतील सामन्यांची उत्साहात सुरवात झाली असून पहिल्या साखळी फेरीच्या दोन दिवसीय सामन्यात, क्लब ऑफ महाराष्ट्र, वायएमसीए क्रिकेट क्लब पुणे व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघानी विजय मिळवला आहे. रिलायन्स नागोठणे येथील मैदानावर झालेल्या रायगड विरुद्ध नाशिक संघांमधील सामन्यात रायगडच्या संघानी संथ गतीने गोलंदाजी केली परिणामी रायगडच्या संघाला 28 धावांची पॅन्टल्टी लागली असून, सामना अनिर्णित राहिला असला तरी पहिल्या डावाच्या आधारे सामना नाशिकच्या संघाने जिंकला. नाशिकच्या संघाने पहिल्या डावात सर्व गडी बाद 168 धावा अधिक 28 धावा ह्या संथ गतीने गोलंदाजी केली म्हणून पेनल्टी लागली व एकूण 196 धावा नाशिकच्या संघाने काढल्या तर प्रतिउत्तर देताना रायगडच्या संघाने सर्व गडी गमावत 190 धावा केल्या. दुसऱ्या डावात नाशिकच्या संघाने सर्व गडी बाद 227 धावा काढल्या तर रायगडच्या संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 8 गडी बाद 150 धावा फलकावर नोंदवल्या होत्या. पहिल्या डावात पेनल्टी लागल्यामुळे रायगडच्या संघाला सामना पहिल्या डावाच्या पिछाडीमुळे गमवावा लागला आहे. दुसऱ्या सामन्यात क्लब ऑफ महाराष्ट्रच्या संघानी सेंट्रल झोन विरुद्ध खेळताना एक डाव व 63 धावांनी जिंकला तर वायएमसीए क्लब पुणे संघानी सेंट्रल डिफेन्स अकॅडमी संघावर 78 धावांनी विजय मिळवला आहे. दिनांक 19 फेब्रुवारी पासून दुसऱ्या सकाळी फेरीतील सामन्यांना सुरुवात होणार आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असो.चे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सचिव प्रदीप नाईक यांच्या सह सर्व पदाधिकारी व सदस्य सामने यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी उपस्थित राहून परिश्रम घेत आहेत.

Exit mobile version