मुंबई विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत अनिकेत व आशिषला पदक

। तळा । वार्ताहर ।

खोपोली येथे पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या अनिकेत यादव व आशिष तळकर यांनी पदकांची कमाई केली. या स्पर्धेत 79 किलो वजनी गटात अनिकेतने विद्यापीठ स्तरावरील रौप्य पदक मिळवले तर 74 किलो वजनी गटात आशिष तळकर या विद्यार्थ्यांने विद्यापीठ स्तरावरील कांस्य पदक मिळवले. महाविद्यालयास क्रीडा स्पर्धा प्रकारात विद्यापीठ पातळीवर पहिल्यांदाच ही पारितोषिके मिळाली आहेत. त्यामुळे या दोन्ही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत असून त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा समन्वयक डॉ. नवनाथ गायकवाड व टिम मॅनेजर डॉ. राजाराम थोरात यांचेही सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Exit mobile version