जितेश भोईरला वैदयकीय मदत

। उरण । वार्ताहर ।

उरण येथील रामकृष्ण भोईर यांचा मुलगा जितेश भोईर (16) याला अ‍ॅपलआरस्टाईक अनेमिया नावाचा आजार झाला असून त्याच्या डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी बँन मॅरो ट्रान्सप्लान्ट ऑपरेशनची गरज असल्याचे सांगितले आहे. उपचारासाठी चाळीस लाख बावीस हजार आठ्शे रुपये इतका खर्च लागणार आहे. जितेश भोईर याच्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने रामकृष्ण भोईर यांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत विजय विकास सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत जितेशच्या उपचारासाठी पंचवीस हजार रुपये सुपूर्द कले.

जितेश भोईर याच्या ऑपेरेशनसाठी समाजातील सर्व दानशूर व्यक्ती, विविध सामाजिक संस्था संघटनांनी पुढे येऊन सामाजिक बांधिलकी जपत सढळ हाताने मदत करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Exit mobile version