‘मोठीजुई प्रीमियर लीग’ 2024
। उरण । वार्ताहर ।
एकाच गावातील खेळाडूंची लिलाव पद्धतीने 16 संघांची निवड करून त्याची लीग ठेवली जाते. ती उरण तालुक्यातील मानाची टेनिस क्रिकेट स्पर्धा समजली जाणारी ‘मोठीजुई प्रीमियर लीग’ 2024 च्या चौथ्या पर्वाचे दिमाखदार आयोजन ए व्ही स्पोर्ट युवा प्रतिष्ठान मोठीजुईच्या माध्यमातून केले गेले होते. या पाच दिवसीय खेळल्या गेलेल्या स्पर्धेचा 31 डिसेंबर रोजी अंतिम फायनल सामना झाला. एकूण सोळा संघ मालकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यात आपल्या खिलाडूवृत्तीने अंतिम चार संघ टॉप 4 मध्ये पोचले त्यापैकी शिवाज्ञा ईटरप्रायझेस संघ प्रथम क्रमांक, प्रिन्सि प्रिता इलेव्हन संघ द्वितीय क्रमांक, एसएसडी इंडियन संघ तृतीय तर काव्य ईटरप्रायझेस संघ चतुर्थ क्रमांकचा मानकरी ठरला. डीआरव्ही संघातून आपल्या टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात करून आपल्या दमदार खेळवृत्तीने उरण तालुक्यात विविध स्पर्धा खेळत आपल्या नावाचा एक ब्रँड तयार केला आणि आपल्या आर्थिक परिस्थिती वर मात करीत व्यावसायिक क्रिकेटला सुरुवात केली. यंदाच्या एमपीएलमध्ये तीन अर्धशतकीच्या बहारदार खेळीने 8 विकेट संपादन करून 22 षटकार अशा तब्बल 288 धावा काढून 2024 या स्पर्धेत जितेश भोईर मालिकावीर ठरला. त्याला बाईक बक्षिस देण्यात आली.
या लीग स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज म्हणून यश पाटील याला सायकल, उत्कृष्ट फलंदाज हेमंत पाटील याला सायकल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हर्ष भोईर याला शूज, रायझिंग स्टार साठी हर्ष भोपी याला उत्कृष्ट चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी स्मार्टसिटी डेव्हलपर्सचे प्रवीण घासे, सरपंच दिपक भोईर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.