राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केलि जागेची पाहणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील उसर येथील नियोजित वैद्यकिय महाविद्यालयाच्या कामाला वेग आला असून लवकरच सदर महाविद्यालयाचे भुमीपूजन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात तयारीच्या पाहणीसाठी राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आज उसर येथील जागेची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी अलिबाग जवळील उसर येथे एमआयडीसी व इतर मिळून 50 एकरहून अधिक जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सदर जागेत लवकरच भुमीपूजन करुन बांधकामाला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यानुसार आज राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे सदर जागेची पाहणी केली. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने व शासकीय अधिकारी वर्ग यांच्यासह अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता ढवळे, युवक अध्यक्ष मनोज शिर्के, व्यापारी संघटना तालुका अध्यक्ष सचिन पाटील, उपाध्यक्ष जयेंद्र भगत, उपाध्यक्ष हेमनाथ खरसंबळे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष लवेश नाईक आदी उपस्थित होते.