मेडिकलच्या दुकानाला आग

। रसायनी । वार्ताहर ।
चौक बाजारपेठेतील पराग ठाकूर यांचे विद्या मेडिकल दुकानाला पहाटे चारच्या दरम्यान शॉर्ट सर्किटने आग लागली. शेजारी राहणार्‍यांना दुकानातून धूर येताना दिसला, त्यांनी दुकानात काम करणारे अरुण, नरेश यांना आगीसंबधी माहिती दिली.अरुण हे दुकानात येई पर्यत आगीने रौद्ररूप धारण केले होते. मेडिकल दुकानात असलेले पॅमपर्स व सॅनिटरी नॅपकिन यांनी त्वरित आग पकडल्याने आगीचा भडका उडाला, छताला असलेला सिलिंग फॅन,दोन संगणक,औषधांची कपाटे जळून खाक झाली होती. तर औषधांच्या बाटल्या यांचा स्फोट होत होता,चौक बाजारपेठेमधील शेजारी ग्रामस्थांनी अग्निशमन दलाला पाचारण करून घरातली पाणी आणून आग आटोक्यात आणण्यासाठी सशर्त प्रयत्न केले, अग्निशमन दल येईपर्यंत बेचिराख झाली होती.यात जवळपास अंदाजे पस्तीस लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चौकचे सपोनि. युवराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोह.सचिन व्हसकोटी पुढील तपास करीत आहेत.

Exit mobile version