। तळा । प्रतिनिधी ।
ग्रुप ग्रामपंचायत महागाव यांच्याकडून प्राथमिक आरोग्य केंद्र महागावला औषध साठा पुरवठा करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथे पंचक्रोशीतील कोरखंडे, महुरे, बारपे, महागाव, आदिवाडीवाडी, विनवली, बहुलेवाडी, वडाचीवाडी, वावेदिवाळी, भुवन आदिवासी वाडी, मोऱ्याचीवाडी अशा गावातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्ण संख्या जास्त प्रमाणात असल्यामुळे आरोग्य अधिकारी डॉ. कुणाल मनवल यांनी ग्रामपंचायतीकडे औषध साठा पुरविण्याची मागणी केली असता ग्रामसभेत एकमताने औषध साठा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टरांनी मागणी केलेला औषध साठा विस्तार अधिकारी तथा प्रशासक पुष्पा नेरकर, ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा तांबडे, माजी सरपंच सुषमा कांतीलाल कसबळे, माजी सदस्य, पोलीस पाटील, ग्रामस्थ संतोष आमले, कमलाकर मांगले, कृष्णकांत मानकर, गंगाराम साळवी व महिला मंडळ यांच्या हस्ते डॉक्टरांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करत प्राथमिक आरोग्य केंद्रचे अधिकारी कुणाल मनवलं यांनी महागाव ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त केले.







