। मुंबई । प्रतिनिधी ।
आता एटीएमच्या माध्यमातूनही औषध उपलब्ध होणार आहेत. दुर्गम भागातील नागरिकांना आता 24 तास औषधे उपलब्ध होणार आहेत. देशातील प्रत्येक विभागात औषधांचे हे मशीन बसवण्यात येणार आहे. त्यामुळं नागरिकांना आता 24 तासात कधीही औषध उपलब्ध होणार आहेत.
केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून या आधीपासून देशातील काही राज्यात ही सेवा सुरू आहे. केंद्र सरकारने आंध्र प्रदेशातील -ढचन या संस्थेसोबत एक करार केला आहे. त्यानुसार आधीपासूनच ब्लॉक स्तरावर अयूर संजिवनी केंद्र सुरू आहेत. या केंद्रावर आता ही औषधांची एटीएम बसवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
देशातील एकूण सहा हजार ब्लॉकमध्ये असं औषधांचे मशीन बसवण्यात येणार आहे. डॉक्टरांनी दिलेली प्रिस्क्रिप्शनची चिठ्ठी या मशीनमध्ये टाकल्यानंतर ही औषधं उपलब्ध होणार आहेत. गर्भधारणा किट, करोना तपासणी, ऑपरेशन संबंधी औषधे आणि इतर अनेक वैद्यकीय उपकरणं आणि इतर प्रकारची औषधे या एटीएममधून मिळणार आहेत. तसंच, या माध्यमातून ग्रामीण उद्योजकांना पुढील महिन्यापासून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. औषधांच्या या एटीएमनं ई-कॉमर्स कंपन्यांकडून औषधांचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळं नागरिकांना औषधं 24 तास उपलब्ध होणार आहेत.