राजमाता जिजामाता तलाव परिसरात बैठक व्यवस्था

मॉर्निंग वॉक ग्रुपकडून पुढाकार

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ येथे सकाळ, संध्याकाळ चालण्याचे ठिकाण बनलेल्या मॉर्निंग ग्रुपकडून तलाव परिसरात बसण्यासाठी बैठक व्यवस्था आणि दिव्यांची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन नेरळ ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

नेरळ ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला असलेल्या राजमाता जिजामाता तलाव परिसरात काही पथदिव्यांवर विजेचे बल्ब नादुरुस्त झाले होते. त्या पथदिव्यांवर नवीन बल्ब आणि त्या खांबांवर विजेची रोषणाई अशी कामे सकाळ आणि संध्याकाळ चालण्यासाठी असलेल्या ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. त्याचवेळी याच मॉर्निंग वॉक ग्रुपकडून तलाव परिसरात झाडाच्या सावलीमध्ये बसण्यासाठी बैठक व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू होते. तलाव परिसरात नव्याने सात बाकडे आणि पथदिवे यांचे उद्घाटन 15 जानेवारी रोजी रात्री करण्यात आले. नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी आणि उपसरपंच मंगेश म्हसकर यांच्या हस्ते तलाव परिसरात राजमाता जिजामाता यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले. त्यावेळी ज्येष्ठ नागरिक आणि मॉर्निंग वॉक ग्रुप मधील सदस्य उपस्थित होते.
तलाव परिसरात बसण्यासाठी सात बाकडे बसविण्यात आले असून, त्यातील नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आणि ग्रुपचे सदस्य संदीप म्हसकर यांनी दिले आहेत. तर प्रवीण गायकवाड, प्रशांत गायकवाड, सावळाराम जाधव, संदीप राणे आणि सुजाता पाटील या सहा सदस्यांनी दिले आहेत. त्याचवेळी विजेची रोषणाई आणि दिव्यांसाठी आर्थिक निधी ग्रुपमधील सदस्य बाळा भगत, पुंडलिक भोईर, विलास कांबळे, कृष्णा शेकर, सदानंद जाधव, रंभाजी भोईर, अशोक वाडकर, बाळकृष्ण साळवे, डॉ. राजपूत, संतोष राऊत, देविदास राठोड, बाका मरे, संदीप फणसे, मधुकर गवळी, जनार्दन पवार,विजय पवार, प्रकाश डायरे, जगदीश डबरे, जयवंत साळुंखे, किसन खडे, आंबो शिनारे यांनी दिला आहे. मॉर्निंग ग्रुपच्या कार्याचे नेरळ ग्रामपंचायतीकडून कौतुक करण्यात आले.

Exit mobile version