ई रिक्षासंदर्भात अलिबागमध्ये बैठक

| माथेरान | प्रतिनिधी |
गेले तीन महिने माथेरानकरांची जीवनवाहिनी ठरलेली ई रिक्षा पुन्हा सुरु होणार की नाही याबाबतचा निर्णय सोमवारी (20 मार्च) अलिबाग येथे होणार्‍या बैठकीत घेतला जाणार आहे. त्यामुळे तमाम नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटकांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने तीन महिने प्रायोगिक तत्वावर माथेरानमध्ये ई-रिक्षा हा प्रकल्प राबविला. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थी,पर्यटकांनीही झाला.शिवाय पालिकेच्या उत्पन्नातही वाढ झाली. पण हा तीन महिन्यासाठी प्रायोगित तत्वावर प्रयोग राबविण्यात आला होता.

त्याची मुदत संपल्यावर ई रिक्षा सेवा बंद करण्यात आली.सध्या या सर्व रिक्षा पालिकेच्या शेडमध्ये उभ्या करुन ठेवण्यात आल्या आहेत.या संदर्भात सोमवारी अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन आणि माथेरान सनियंत्रण समिती यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत ई रिक्षा पुन्हा सुरु करायच्या की नाहीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

Exit mobile version