| माथेरान | वार्ताहर |
अथक परिश्रमानंतर धावू लागलेल्या ई-रिक्षाला पहिल्याच दिवसांपासून माथेराकरांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. तीन महिन्यांसाठी ई-रिक्षा सुरू केली असून याचा स्वस्त आणि मस्त प्रवास सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आहे. त्यामुळे येथील शालेय विद्यार्थी जेष्ठ नागरिक, दिव्यांग व येणारे पर्यटक यांना उत्तम पर्याय उपलब्ध झाला असून सर्वच बेहद खुश आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत पालिकेने सात ई-रिक्षा खरेदी करून तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर सुरू केल्या आहेत. शैक्षणिक दृष्ट्या ई-रिक्षामुळे विद्यार्थ्याना शाळेत नेण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर पालकांची पायपीट थांबली आहे. दररोज अंदाजे चार किलोमीटर होणारा विद्यार्थ्यांचा पायी प्रवास आत्ता ई-रिक्षामुळे आरामदायक सुरू झाला आहे. तसेच या ई-रिक्षा मुळे दस्तुरी नाका ते माथेरान रेल्वे स्टेशन हे अडीच ते तीन किलोमीटर अंतर नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी खूप स्वस्त दरात उपलब्ध झाले आहे.
ई-रिक्षामुळे माथेरानच्या पर्यटनात मोठा बदल झालेला येथे पहावयास मिळत आहे. बॅटरीवर चालणार्या ई-रिक्षा मुळे पर्यटकांना स्वस्त आणि मस्त प्रवास मिळत असल्याने ई-रिक्षा साठी पर्यटकांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. या ई-रिक्षाचा माथेरानला वाढता प्रतिसाद बघता विकेंड मध्ये या सात ई-रिक्षा कमी पडणार की काय असे स्थानिकां मधून बोलले जात आहे. सध्या सुरू झालेल्या स्वस्त आणि मस्त या ई-रिक्षांमुळे शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, दिव्यांग व पर्यटक मात्र बेहद खुश झाले आहेत.
आम्ही पाच कीलोमीटर चालत होतो. चालताना पाय दुखायचे ,कंटाळा यायचा पण वडिलांनी रिक्षा गाडीत बसविले त्यामुळे रोज सकाळी आम्ही फ्रेंड्स गाडीतून शाळेपर्यंत जातो आणि शाळा सुटली की पुन्हा गाडीमधून येतो. आता खूप मजा वाटते.
उन्नती केतन रामाणे
विद्यार्थ्यांनी