| मुंबई | प्रतिनिधी |
केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असून, राज्यात मान्सूनचे आगमन 8 ते 10 जूनदरम्यान होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागप्रमुख एस.डी. सानप यांनी दिली.
सानप म्हणाले, मान्सून सध्या अरबी समुद्रातून श्रीलंका मार्गे अंदमान-निकोबारपर्यंत पोहोचला आहे. मात्र, केरळमध्ये दाखल होण्यासाठी आवश्यक वातावरणीय परिस्थिती अद्याप पूर्णपणे अनुकूल झालेली नाही. पुढील चार दिवसांत परिस्थिती पोषक झाल्यास मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. दरम्यान, विदर्भात पुढील दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात उष्णतेची लाट तसेच काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 28 मेनंतर विदर्भातील तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचेही सानप यांनी सांगितले.






