शेतकरी सेवा संघाची सभा

। सुतारवाडी । वार्ताहर ।

कोलाड पूर्व विभाग शेतकरी सेवा संघ कुडली, सुतारवाडी, जामगावची वार्षिक जनरल सभा मनोहर साळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सर्वांनुमते पुन्हा मनोहर साळवी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी मारुती वाळंज, कार्याध्यक्ष विष्णू मोरे, सचिव दशरथ पवार, उपसचिव नरेश कदम, खजिनदार अशोक शेपोंडे, तर संचालक भागाराम मंचेकर, दत्ता जाधव, माणिकराव सावंत, किसन पडवळ, सुरेश जाधव, राजाराम कोंडे, आनंता जांभळे यांची निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून गोरखनाथ कूर्ले, चिंतामण दळवी, गोपीचंद कदम, वामन शिंदे, कृष्णा तटकरे, विजय महाडिक, राजू अडलीकर, नथुराम साळवी, विजय सावंत, गंगाराम सावंत, संभाजी जाधव आदींची निवड करण्यात आली.

Exit mobile version