। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठानची नवीन कार्यकारणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये घेण्यात आली. याप्रसंगी खांबेरे गावचे प्रगतशील शेतकरी गणेश भगत यांची संस्थेच्या अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. 9 डिसेंबर 2021 या दिवशी रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठानचा पाचवा वर्धापन दिन साजरा होत असताना कृषि दिनदर्शिका व शेतकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. संस्थेचे माजी सचिव आणि नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश भगत यांनी संस्थेच्या माध्यमातून मागील चार वर्षात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा सादर केला. गणेश भगत-अध्यक्ष, अनंत मगर-उपाध्यक्ष, पांडुरंग भेरे-सचिव,अतुल पाटील-सहसचिव, धनंजय जोशी-खजिनदार, हसनभाई म्हस्लाई-संचालक ,गोपीनाथ गंभे भाऊ डिके, रतिश मगर, संतोष दिवकर, विनोद पाटील, रामचंद्र म्हात्रे, दगडू बामुगडे, खेळू थिटे, मिलिंद म्हात्रे, अॅड. महेश घायले, रमेश पाटील, रघुनाथ कडू, विजय दिवकर, संताजी ठाकूर, शिवाजी जाधव, सुदाम महाडिक, दिनकर सानप, अजय लोटनकर, रोहित देवकर, विलास थिटे यांची निवड करण्यात आली आहे.