। सुतारवाडी । वार्ताहर ।
येरळ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक केंद्र प्रमुख खेमसिंग चव्हाण यांना गुरु गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यास अधिक गती मिळण्यासाठी आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या सभागृहात बंजारा समाजाच्या वतीने भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था शाखा रोहाच्यावतीने सत्कार करण्यात आला. जिल्हा उपाध्यक्ष बादल जाधव, संजय चव्हाण, उमेश महाडेश्वर तारासिंग राठोड, सुभाष जाधव, मेहरबान राठोड, अशोक राठोड, सुरेश राठोड, संजय पवार, अमोल राठोड, शंकर जाधव, उमाजी जाधव, संदिप चव्हाण, मनोज जाधव, नितीन राठोड, प्रकाश चव्हाण, बाबू चव्हाण, शरद पवार, गजानन जाधव, किसन शिंदे, अब्दागिरे उत्तम राठोड, विठ्ठल पाटील, भोसले आदिंच्या प्रमुख उपस्थितीत चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.