शेकापच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक

| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |

खालापूर येथे होणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या 2 ऑगस्ट वर्धापन दिनाच्या नियोजनासाठी शेकापच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी (दि.21) पाली येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेकापचे रायगड जिल्हा चिटणीस सुरेश खैरे होते. यावेळी बैठकीस महिला मंडळ, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन, तयारी आणि जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना सुरेश खैरे यांनी, कार्यकर्त्यांना पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आणि वर्धापन दिन मोठ्या उत्साहात यशस्वी करण्याचे आवाहन केले. तसेच, दि.2 ऑगस्टचा वर्धापन दिन खोपोली येथे मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार असून, त्यासाठी विविध समित्यांचीही घोषणा करण्यात आली.

Exit mobile version