| महाड | प्रतिनिधी |
तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात आज पीएम किसानचे पैसे जमा झाले. दरम्यान, नाते आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते बिपीन महामुणकर यांनी सरकारी योजनांचा लाभ घेऊन उत्कृष्ट शेती करण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गरीब शेतकऱ्याला मदत करण्याच्या हेतूने पीएम किसान पेंशन योजना सुरू केली आहे. या योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील राज्य सरकारच्या वतीने वर्षाला सहा हजार जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने आज केंद्राचे दोन व राज्याचे दोन असे 4000/- असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्तात जमा झाले.
याबाबत माहिती व जनजागृती करण्यासाठी महाड कृषी विभाग आणि भाजपच्यावतीने नाते या गावात शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, तालुका कृषी अधिकारी बी.पी. कदम, संदीप ठोबरे, सरचिटणीस महेश शिंदे, उपतालुकाध्यक्ष चंद्रजित पालांडे, शहर अध्यक्ष निलेश तळवटकर, शेतकरी मोर्चा चे किशोर जामदार, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक, ग्रामसेवक सह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.