लाडवली येथे पोलीस पाटील संघटनेची बैठक

। महाड । वार्ताहर ।
न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना यांची लाडवली येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ व वयोमर्यादा वाढविण्याच्या मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी अनंत पाटील राज्य उपाध्यक्ष, संजय पाटील जिल्हा उपाध्यक्ष रायगड, महादु पाटील खजिनदार, सुरेश सोनावणे, संतोष पिंगळे, रमेश पाटील, उतेकर, भरत पाटील, रामदास म्हात्रे, राजु शिंदे पोलादपुर, विनोद पाटील, उषा येरुणकर, हरीभाऊ पाटील, व महाड तालुकाध्यक्ष साक्षी पालांडे तसेच ईलियास ढोकले व संदीप पाटील, संजय सुरवे, निलेश चिविलकर, संतोष पेंढारी, रशीदा लंबाडे व पोलीस पाटील शिरगांवकर उपस्थित होते. यावेळी पोलीस पाटील मानधन वाढ तसेच वय मर्यादा 60 वरून 65 करणे तसेच नुतनिकरण बंद करणे व संघटना मजबूत करणे अशा अनेक विषयावर चर्चा होऊन शासनाकडे यासंदर्भात मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Exit mobile version