पालीत शेकाप-राष्ट्रवादी आघाडीची सभा

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पालीत नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून खा: सुनिल तटकरे यांची शेकाप-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांसाठी धडाकेबाज सभा पार पाडली.
खासदार सुनिल तटकरे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते वसंतराव ओसवाल यांची विकासात्मक दूरदृष्टी व्यापक आहे, त्यांनी पाली गावाच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाणी साठवण टाक्या निर्माणासाठी विशेष पुढाकार घेतला. हे कौतुकास्पद आहे, सुधागड तालुक्यात सर्वाधिक विकासकामे, लोककल्याणकारी योजना राष्ट्रवादी व शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून झाल्या आहेत, असे खासदार तटकरे यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी माजी आ.धैर्यशील पाटील म्हणाले की, पाली नगरपंचायतीच्या माध्यमातून आपण आधुनिकतेकडे मार्गक्रमण करतोय. पाली शहराच्या सर्वांगीण व सर्वंकष विकासासाठी जनतेने गुणांकण पाहून विकासदृष्टी व चांगला आचार विचार असलेल्या उमेदवारांच्या हातात नगरपंचायतीची सत्ता द्यावी व आपणास अपेक्षित विकास घडवून आणावा असे आवाहन पाटील यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंतराव ओसवाल, शेकाप नेते सुरेश खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष गीता पालरेचा, राष्ट्रवादी सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, ग.रा.म्हात्रे, माजी सभापती साक्षी दिघे,राष्ट्रवादी सुधागड तालुका महिला अध्यक्षा रुपाली भणगे, शहर अध्यक्ष अभिजित चांदोरकर,पंचायत समिती सदस्य सविता हंबीर, आदींसह शेकाप व राष्ट्रवादी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version