रायगड जिल्हा सेवानिवृत्त संघटनेची सभा उत्साहात

| भाकरवड | वार्ताहर |
रायगड जिल्हा सेवानिवृत्त संघटनेची सभा अलिबाग तालुक्यातील पांडबादेवी येथील श्री पाटील ब्रदर्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष धुरंधर पाटील, तालुकाध्यक्ष सुधीर पाटील होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सुचिता पाटील यांच्या ईशस्तवन आणि स्वागत गीताने करण्यात आली. दरम्यान, जिल्हाध्यक्ष धुरंधर मढवी, तालुका अध्यक्ष सुधीर पाटील, संजय राऊत चार्टर अकाऊंटंट, नारायण भोईर उपाध्यक्ष, शेखर पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या हस्ते दहावी, बारावीच्या गुणवंत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचा तर 70 वर्षे पूर्ण पात्र संघटनेचे सभासद यांचा शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. उपाध्यक्ष शेखर पिंगळे यांनी प्रस्तावित केले.

या कार्यक्रमासाठी रेवदंडा, रामराज, अलिबाग, मांडवा, हाशिवरे, कुर्डुस, पोयनाड, शहाबाज, पळी कोपर, लेभी शहापूर आदी विभागाचे पाचशेहून अधिक विभाग प्रमुख सदस्य उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने पोलीस, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, जिल्हा परिषदेचे कर्मचारी, महसूल विभाग, मजगाव डॉक, महानगरपालिका कर्मचारी आदी वेगवेगळ्या क्षेत्रातील सेवानिवृत्त सभासद उपस्थित होते. यावेळी सचिव उल्हास गावंड यांनी 1 एप्रिल ते मार्च 2022 चा जमाखर्च वाचन केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाराम भगत यांनी केले. कार्यक्रम संपन्न करण्याकरिता सर्व सभासदांनी मेहनत घेतली.

Exit mobile version