| माणगाव | सलीम शेख |
सुवर्ण क्रांती अर्बन मल्टीस्टेट निधी लिमिटेड बँकेची सभा गुरुवारी (दि.1) बँकेचे संस्थापक सुखदेव म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत माथेरान येथे संपन्न झाली. या सभेत बँकेच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी लीडर डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वांनी भरभरून असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी बँकेचे संस्थापक सुखदेव म्हात्रे यांनी आपल्या मार्गदर्शनात बँकेच्या प्रगती विषयी बँकेचा अहवाल, बँकेची नियमावली व रूल रेग्युलेशन, तसेच बँकेच्या योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमामध्ये बँकेत उत्कृष्टपणे काम करणारे माणगाव शाखेमधून संदीप सकपाळ, लतिका पोटले, अंकिता हर्णे, किशोर झेमसे, शंकर जाधव, नरेंद्र पेणकर, पूजा शिर्के, संजीवनी सकपाळ, सुरेश पोटले, अक्षदा मोरे, भक्ती नागावकर, पुणे येथील भरत दानवे तसेच महाड, बिरवाडी, पोलादपूरमधून साक्षी कदम, प्रेरणा तळवटकर, सुशांत जाधव, संगीता जाधव, श्रीहरी जाधव यांचा संस्थापक सुखदेव म्हात्रे यांच्याहस्ते पारितोषिके देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बँकेचे रायगड शाखेचे प्रमुख राकेश पडवळ यांनी करून उत्साहात या कौटुंबिक सोहळ्याची सांगता करण्यात आली.







