रस्त्याच्या कामाबाबत बैठक

। तळा । वार्ताहर ।
तळा बाजारपेठेतील रस्त्याच्या कामाबाबत शुक्रवारी सकाळी 11 वाजता नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्यात आली आहे.

तळा बाजारपेठेत काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप तळा भाजपकडून करण्यात आला आहे.यांसह परीट आळी,समर्थ नगर, मुळे नाका ते बळीचा नाका ई. ठिकाणी करण्यात आलेली कामे देखील निकृष्ट दर्जाची असून सदर रस्त्याच्या बांधकामामध्ये इन्स्टिमेंट प्रमाणे रेडी मिक्स(आरएमसी)वापरण्यात आलेले नाही तर साधा मिक्सर वापरून हाताने केलेलं काम आहे.

तसेच बांधकाम करताना केमिकल अथवा योग्य दर्जाचे सिमेंटही वापरण्यात आलेले नाही.असे अनेक आरोप तळा भाजप कडून करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने मुख्याधिकारी चव्हाण यांच्या उपस्थितीत 11 वाजता तळा नगरपंचायत कार्यालयात बैठक पार पडणार असून सदर बैठकीत रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी तसेच 6 इंच आरएमसी मध्ये बांधकाम होत नाही तोपर्यंत सर्व रस्त्यांचे बिल हे स्थगित करण्याची मागणी करणार असल्याचे भाजप प्रदेश सचिव रवि मुंढे यांनी सांगितले.

Exit mobile version