वरदविनायक कमिटीचे तहसीलदारांना निवेदन

| खोपोली | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यात अष्टविनायकापैकी एक असणारा महड येथील वरदविनायक या रूपात हा गणपती सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण करणारे गणराज म्हणून ओळख आहे. मात्र, या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला किती कालावधी लागेल याबाबत शंका उपस्थित करीत ग्रामस्थ आणि महड देवस्थान विश्वस्त कमिटींनी शासन व ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण करण्यासाठी एक लेखी जाहिरनामा तयार करावा. त्यात किती कालावधी लागणार आणि निधी बाबत कोणतीही अडचण येणार नाही असे हमीपत्र बनवावा आणि कामाला सुरुवात करावी असा निर्णय एक मताने घेतला आहे. याचे निवेदन खालापूर तहसील कार्यालयास 29 मे रोजी दिले आहे.

मंदिराच्या जीर्णोद्धार होणार असल्याने येथील महड ग्रामस्थांच्या काय भावना आहेत यासाठी देवस्थान कमिटीने सदरची प्राथमिक चर्चा करण्यासाठी मागील काही दिवसांपूर्वी बैठक बोलावली होती. महड येथील मंदिरासाठी 28 कोटी हुन अधिक निधीही मंजूर केला आहे. या कायमचा कालावधी तीन वर्षांचा असेल. गणपती बाप्पाच्या वस्तू सह अन्य व्यवसाय करून येथील 80 टक्के कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. त्याचा कालावधी लेखी स्वरूपात दिलेल्या ठेकेदाराकडून जाहीर करावा या मागणीसाठी खालापूर नायब तहसीलदार विकास पवार व नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्याकडे देवस्थान कमिटी व ग्रामस्थांनी निवेदन सादर केले.

यावेळी मोहिनी वैद्य, किरण काशीकर, राजेंद्र बडगुजर, राजेंद्र तट्टू, अतुल तट्टू, सुनीता पाटील, श्वेता गुरव, मीनल कबले, मंदार जोशी, संभाजी पाटील, गणपत पाटील, किशोर पाटील, पद्माकर पाटील, राजू केदारी, गणेश कबळे, संतोष मीरकुटे, रामदास पाटील, गीता पाटील, तेजस पवार यासह उपस्थित होते.

ठरलेला निधी द्या
मंदिराचा जीर्णोद्धार करताना त्यासाठी ठरलेला निधी कमी पडू न देता जो कालावधी जाहीर होईल त्यावेळेतच पूर्ण करावा व आम्हाला उपासमारीपासून वाचवावे अशी मागणी केली आहे.
Exit mobile version