| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात होऊ घातलेला टोरंट जलविद्युत प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवदेन त्यांनी तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना दिले आहे. तसेच, शासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचा महिला आघाडी तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा संतप्त इशाराही यावेळी देण्यात आला.
पर्यावरण ऱ्हास करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पाला कर्जत तालुक्यातून हद्दपार करा आणि कर्जत तालुक्यातील प्रदूषण मुक्त वातावरण कायम ठेवा, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कर्जत तालुकाप्रमुख करुणा बडेकर, जिल्हा परीषद सदस्य सुनिता मोरे, पंचायत समिती सदस्य नमिता श्रीखंडे, हालिवली माजी सरपंच प्रमिला बोराडे, उपतालुका प्रमुख संगीता खडे, युवती सेना प्रमुख अर्चना म्हसे, कर्जत शहर प्रमुख योगिता डागा, मिरकुटे महिला विभाग संघटक आदी उपस्थित होते. महिला आघाडीच्यावतीने कर्जत तहसीलदार धनंजय जाधव व कर्जत उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांना निवेदन देण्यात आले.
टोरंट प्रकल्पाविरोधात तहसीलदारांना निवेदन
