पनवेलमध्ये स्मृती चषक बुद्धिबळ स्पर्धा

| पनवेल | वार्ताहर |

कृष्णभारती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने डॉ. पटवर्धन स्मृती चषक बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली. बुद्धिबळ स्पर्धेत सातारा, माणगांव, खोपोली, कर्जत, अलिबाग, पनवेल, उरण, मुंबई, कल्याण येथील 140 स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन कृष्णभारती चॅरिटेबल ट्रस्टचे विश्‍वस्त उदय टिळक तसेच उत्कल घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेत खुल्या गटात प्रथम क्रमांक जाईल अथर्व (वाशी), द्वितीय क्रमांक ओंकार कडव (सातारा), तृतीय क्रमांक पल्लवी यादव (पनवेल), चतुर्थ क्रमांक गोसावी आरव (नवी मुंबई), पंचम क्रमांक आयुष अभानी (खोपोली), उत्कृष्ट महिला पूर्वा पेडणेकर (अलिबाग) यांनी पटकावला, तर पंधरा वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक अभिलाष यादव (पनवेल), द्वितीय क्रमांक अथर्व वाघ (अलिबाग), तृतीय क्रमांक अतुल्य गुप्ता, चतुर्थ क्रमांक झा रसेश, पंचम क्रमांक सर्वेश कराडे, उत्कृष्ट मुली प्रथम क्रमांक युगंधरा शिंपी, द्वितीय क्रमांक बीवी आशिया, तर अकरा वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक कवीश कागवडे, द्वितीय क्रमांक अद्वैत ढेणे, तृतीय क्रमांक श्रीवास्तव शिवम, चतुर्थ क्रमांक चोप्रा जहाँ, पंचम क्रमांक गणबावळे आर्येश, मुलींमध्ये प्रथम क्रमांक चोप्रा जीविका, द्वितीय क्रमांक तन्नू ओवीया. उत्तेजनार्थ क्रमांक अमोघ आमरे, त्रिपाठी तपेश, देव श्‍लोक, आयुष डूचे, ई अभिषेक, यशराज राठी यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा अत्यंत उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. स्पर्धेत 26 स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सर्वांना सहभागी प्रमाणपत्र ऑनलाइन देण्यात आले. स्पर्धा पार पाडण्यासाठी माय स्पर्धा डॉट कॉमचे सुजित टिळक ह्यांनी विशेष सहकार्य केले.

यावेळी पनवेल बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव सी.एन.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बक्षिस वितरणासाठी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार विलास म्हात्रे, पनवेल चेस असोसीएशनचे उपाध्यक्ष समीर परांजपे, कृष्णभारती चॅरिटेबल ट्रस्टचे विश्‍वस्त उदय टिळक, राकेश फाटक, रोटरीयन मिलींद बोधनकर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पंच म्हणून सिद्धेश ठिक तर सहाय्यक पंच चंद्रशेखर पाटील, चेतन म्हात्रे, सार्थक मिंडे, श्रेयस पाटील, विकास घातुगडे, विजय ठिक यांनी काम पाहीले.

Exit mobile version