ग्रेट ब्रिटनवर 3-1 ने विजय
टोक्या | वृत्तसंस्था |
भारतीय हॉकी संघाने उपांत्यपूर्व सामन्यात ग्रेट ब्रिटनला 3-1 ने विजय मिळवत इतिहास घडविला आहे. भारत आता पदकापासून एक पाऊल दूर आहे. विशेष म्हणजे, 1972 नंतर भारताने पहिल्यांदा उपांत्य सामन्यात धडक दिली आहे.
या सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये सुरुवातीलाच भारताकडून दिलप्रीत सिंगने सातव्या मिनिटाला शानदार फिल्ड गोल करत भारताला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसर्या कोर्टमध्ये 16 व्या मिनिटाला गुर्जंत सिंगने 16 व्या मिनिटाला गोल केला. यासह भारताला 2-0 ने आघाडी मिळाली. त्यानंतर तिसर्या क्वार्टरच्या शेवटच्या क्षणी ग्रेट ब्रिटनने एक गोल करत भारताविरुद्ध शानदार पुनरागमन केले. ग्रेट ब्रिटनसाठी वॉर्डने पेनल्टी कॉर्नरमध्ये मिळालेल्या चेंडूमार्फत गोल केला. तरीही सामन्यात भारत 2-1 ने पुढेच होता.
विशेष म्हणजे, सामन्याच्या अंतिम क्षणी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगला येलो कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे तो मैदानातून बाहेर गेला होता. त्याला 5 मिनिटांसाठी मैदानातून बाहेर राहावे लागले. त्यामुळे भारत 10 खेळाडूंसोबत खेळला.
यानंतर भारताने पुन्हा एकदा आघाडी घेतली. हार्दिक सिंगने सामन्याच्या 57 व्या मिनिटाला मैदानी गोल केला. त्यामुळे भारताने 3-1 ने आघाडी घेतली आणि सामना खिशात घातला.