पीएनपी शाळेत मानसिक आरोग्याबाबत जनजागृती

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग-रायगड यांच्या मार्फत प्रभाकर पाटील माध्यमिक शाळा वेश्वी-गोंधळपाडा येथे 2 डिसेंबर रोजी मानसिक आरोग्य व आजारासंबंधी जनजागृती या संदर्भात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमा करिता समाजसेवा अधीक्षक धनश्री कडू आणि क्लिनीकल सायक्लॉजिस्ट प्रफूल्ला कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर आणि इतर शिक्षकवृंद उपस्थित होते. धनश्री कडू व प्रफूल्ला कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य आजार जनजागृती या विषयांतर्गत मानसिक आजार म्हणजे काय? त्याची लक्षणे, गंभीर स्वरुपाचे मानसिक विकार, अभ्यासातील ताणतणाव, मोबाईल ॲडीक्शन, अशा विद्यार्थ्यांशी निगडीत असलेल्या विषयावर सखोल माहिती देऊन मानसिक आजार झाला असेल तर काय करावे ? किंवा गंभीर स्वरुपाचे विकार असतील तर जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग-रायगड येथील मानसोपचार बाह्यरुग्ण विभाग 22 येथे जावे किंवा दिलेल्या टोल फ्री नंबर वर संपर्क साधावा हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नूतन ठाकूर यांनी केले.

Exit mobile version