किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबीर

| खांब | वार्ताहर |

सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लि.च्या वतीने सीएसआर अंतर्गत रोहा तालुक्यातील श्रमिक विद्यालय चिल्हे येथे किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य व स्वच्छता आधारित कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. सुदर्शन केमिकल इंड.लि.कंपनीच्या सामाजिक बांधिलकी विभागांतर्गत सीएसआर मुख्य कार्यक्रम प्रमुख माधुरी सणस यांच्या मार्गदर्शनाखाली किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी दरम्यान आरोग्य व स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.होते. यावेळी विद्यार्थ्यींनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे व स्वच्छता राखणे आणि योगाच्या माध्यमातून तंदुरुस्त राहणे या विषयी सखोल मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड चे सीएसआरचे चेतन चौधरी, क्षेत्र अधिकारी अमर चांदले, संस्थेचे सुप्रिया पाटील व समस्थ प्रशिक्षक वर्ग, व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Exit mobile version